इमारतीचे रंगकाम करतांना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
बंडू खोब्रागडे हे रंगकाम व मजुरी करायचे. छोरीया ले-आऊट येथे एका इमारतीला रंग देत असतांना त्यांचा तोल गेला व ते इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले. त्यामुळे त्यांना जबर मार लागला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते इमारतीवरून खाली कोसळताच त्यांच्या सहकारी कामगारांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला. त्यांच्या अशा या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment