खडबडा मोहल्ल्यात राडा, दोन भावंडांना केली बेदम मारहाण, विधिसंघर्षग्रस्त बालकांसह चार आरोपींवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मागील वर्षी अल्पवयीन फिर्यादीच्या लहान भावासोबत अल्पवयीन आरोपीचा वाद झाला होता. त्याचा राग त्याने मनात धरून ठेवला. १५ जुलैला ही भावंडे मोहरमची सवारी पाहण्याकरिता गेली असता आरोपीने जुना वाद उकरून काढला. त्याने दोन्ही भावांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करणे सुरु केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपला मोठा भाऊ बंटी उर्फ सुनिल दिलीप खडतकर (१९) व मित्र विपुल उमेश बेसरकर (१८) तथा एका अल्पवयीन मित्राला सोबत घेऊन या दोन्ही भावंडांना लाथा बुक्य्यांनी बेदम मारहाण केली. मागच्या वर्षी शाळेत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्याकरिता या १४ वर्षीय मुलाने १७ वर्षीय फिर्यादीच्या लहान भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात त्याचे डोके फुटल्याने त्याच्या डोक्याला टाके देखील लागले आहेत. धार्मिक कार्यक्रमात राडा घालत दोन भावंडांना बेदम मारहाण करणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह चार आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंटी उर्फ सुनिल दिलीप खडतकर (१९), विपुल उमेश बेसरकर (१८) तथा १४ व १७ वर्षीय बालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत रंगनाथ नगर येथील १७ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी चारही आरोपींवर भादंविच्या कलम ११८(१), ११५(२), ३२४(४)(५), ३५१(२), ३५१(३), ३(५) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment