एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला वेग आला आहे. पाण्याच्या टांकीपासून एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर प्रचंड उतार असून हा रस्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. विद्यार्थ्यांचेही या रस्त्याने सतत जाणे येणे सुरु असते. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक तयार करणे गरजेचे झाले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासूनही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा रस्ताही प्रचंड उताराचा असल्याने याठिकाणी देखील गतिरोध असणे आवश्यक आहे. त्यामुळे या धोकादायक उतार असलेल्या दोनही रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील पाण्याची टांकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून एसपीएम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. हे दोनही रस्ते प्रचंड वर्दळीचे आहेत. या रस्त्यांवर शाळा व सेतु केंद्र असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे सतत या रस्त्याने जाणे येणे सुरु असते. या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड उतार असून छोटी वाहने या रस्त्याने सुसाट धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका नाकारता येत नाही. तेंव्हा या दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या व प्रचंड उतार असलेल्या या दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक तयार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Comments
Post a Comment