तालुक्यात बरसला दमदार पाऊस, धो-धो बरसलेल्या पावसाने तुडुंब भरले नदी नाले

प्रशांत चंदनखेडे वणी 

पावसाळा सुरु होऊनही तालुक्यात दमदार पाऊस झाला नव्हता. कधी पाऊस दडी मारायचा तर कधी हलक्या पावसाच्या सरी बरसायच्या. सतत पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र १९ जुलैला तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटांसह दमदार पाऊस बरसला. सर्वदूर बरसलेल्या या पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहेत. शेत शिवारात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. तालुक्यातून वाहणारी निर्गुडा नदी दुपदरी भरून वाहू लागली आहे. निर्गुडा नदी तुडुंब भरल्याने गणेशपूर पुलावरून पाणी वाहण्याची भिती वर्तविली जात आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र पावसामुळे जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना कुठेही घडल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून क्षणोक्षणी पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. 

१९ जुलैला सायंकाळी शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. काही क्षणातच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. रात्रभर कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडला. नभात काळेकुट्ट ढग दाटले असल्याने २० जुलैच्या पहाटेही काळोखी परिस्थिती दिसून येत होती. २० जुलैला दुपारी २ वाजेपर्यंत सारखा पाऊस सुरु होता. दुपारी पावसाने थोडी उसंत दिली खरी, पण आकाश मात्र ढगांनी वेढलेले होते. दुपारनंतर शहरात परत रिमझिम पाऊस सुरु झाला. १९ जुलैच्या सायंकाळ पासून २० जुलैच्या सायंकाळ पर्यंत सतत पाऊस सुरु असल्याने तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातून वाहणारी निर्गुडा नदीही दुथडी भरून वाहत आहे. तसेच वर्धा नदीही फुगली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रभर सारखा पाऊस पडल्याने शेत शिवारात पाणी साचले आहे. मात्र शेत पिकांचे नुकसान झाल्याची अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तसेच धो-धो बरसलेल्या या पावसामुळे जीवित व वित्त हानी झाल्याच्या कुठल्याही घटना समोर आल्या नाहीत. हवामान खात्याने तीन दिवस मुसळधार पाऊस सांगितल्याने विपरीत परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेऊन आहे. तसेच अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवरही नियंत्रण मिळविण्यास प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे.



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी