शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश, नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं (उबाठा) पक्षबळ वाढविण्याकरिता गावागावात शिवसेनेच्या शाखा तयार केल्या जात आहेत. शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पक्ष संघटन वाढविण्याचा विडा उचलला असून पक्ष बांधणीकरिता गावागावात जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. वणी विधानसभा क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव असून त्यांचा जनसंपर्कही विस्तृत आहे. संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शिवसेनेत कार्यकर्त्यांचं इनकमिंग सुरूच असून २४ ऑगस्टला नांदेपेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली असून संजय देरकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे यांच्यासह शिवसेना शहर, तालुका व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान शिवसेनेकडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु झाला आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सोहळे आयोजित केले जात आहेत. शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पक्ष वाढविण्याची जबादारी आपल्या खांद्यावर घेत कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. त्यांच्या नेतृत्वात गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या जात आहेत. शिवसेनेच्या कार्याची त्यांना जाणीव करून दिली जात आहे. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून पक्ष संघटन बळकट करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाचं प्राबल्य वाढविण्याकरिता त्यांनी कार्यकर्ता जोडो हे मिशन हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तळागाळातील असंख्य कारकर्ते शिवसेनेशी जुळू लागले आहेत. शिवसेनेचं सर्वसमावेशक कार्य व धोरण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढू लागला आहे. २४ ऑगस्टला नांदेपेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली. त्यांच्या हस्ते शाखा फलकाचेही अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका डीमन टोंगे, शिवसेनेचे गणपत लेडांगे, नेताजी पारखी, दीपांकर वनकर, डॉ. आस्कर, बंडू टोंगे, संजय देठे, विनोद ढुमणे, जगन जुनगरी, प्रेमा धानोरकर, मनोज वाकटी, चेतन उलमाले आदी उपस्थित होते.
नांदेपेरा येथे घेण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात नानाजी डोंगे, वासुदेव बोढेकार, रामअवतार कनाके, शुभम खोंडे, रामकृष्ण खामनकर, पांडुरंग येवले, दिवाकर डोंगे, रविंद्र येवले, रामकृष्ण दुमोरे, राजू चिडे, संजय चिकटे, किशोर चिकटे, अनिकेत चिकटे, विनोद गेडाम, चंद्रज्योती शेंडे, अश्विनी डोंगे यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. तसेच नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखाही गठीत करण्यात आली.
शिवसेना (उबाठा) नांदेपेरा शाखा प्रमुख म्हणून सुरेश शेंडे, सचिव संदीप ठेंगणे, सहसचिव सुभाष झाडे, कोषाध्यक्ष प्रकाश चिडे, शाखा उपप्रमुख, राजू ठमके, पांडुरंग हेपट, सल्लागार निळकंठ टोंगे यांची तर सदस्य म्हणून अविनाश चिकटे, मोहन डोंगे, प्रविण खामनकर, प्रमोद कोल्हे, बंडू तोडसाम, पुंडलिक उईके, गजानन उईके, कार्तिक उईके, महेंद्र निखाडे, विनोद डोंगे, गणपत खोंडे, गणराज किनाके, पांडुरंग खोके, राजकुमार उपखट, संतोष दुमोरे, राजू लांडगे, विठ्ठल विरूरकर, महेंद्र बोधे, कवडूजी डोंगे, राजू डोंगे यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे युवासेना शाखा प्रमुख म्हणून गोपाळ डोंगे, सचिव मनोज झाडे, उपशाखा प्रमुख विवेक चरडे, रोशन गोबाळे, सहसचिव जगदीश देऊळकर, कोषाध्यक्ष गौरव कोल्हे यांचा तर सदस्यांमध्ये प्रवीण खामनकर, निखिल डोंगे, अमित डोंगे, शुभम खोंडे, विक्की चहानकर, प्रज्वल कोल्हे, नयन चिकटे, क्रिष्णा घोडमारे, प्रशांत मिलमिले, निखिल तोडसाम, साहिल ठमके, गणेश खामनकर, राहुल केमेकर, स्वप्नील केमेकर, अमोल चहानकर, संदीप चहानकर, राहुल ठमके, हनुमान उईके, प्रमोद नवले, अभय दुमोरे, हर्षल घोडमारे, वैभव निखाडे, सुनिल गोबाडे, बंटी पाटील, मंगेश ठेंगणे, सोहेल मसाळे, आदिक चहानकर, पवन पिपराळे, सौरभ खोंडे, कार्तिक अंड्रस्कर यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या या पक्ष प्रवेश व शाखा फलक अनावरण सोहळ्याला शिवसैनिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment