शहरात डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांत वाढ, नगर पालिकेकडून उपाययोजनांचा मात्र अभाव

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. डेंग्यूच्या आजाराने रुग्ण फणफणत असतांना नगर पालिका प्रशासन मात्र सुस्त बसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूची रोकथाम करण्याकरिता नगर पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न अथवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डेंग्यूने शहरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरात डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण बरेच वाढले आहेत. शहरात डेंग्यूची साथ आलेली असतांना देखील नगर पालिका प्रशासनाची नियुजनशून्यता दिसून येत आहे. शहरातील काही परिसरातील नाल्या व गटारे सताड खुली आहेत. नाल्यांमध्ये साचून राहणाऱ्या घाण पाण्यात डेंग्यूच्या विषाणूंची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन नागरिकांना डेंग्यूची लागण होऊ लागली आहे. या जीवघेण्या आजारामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतांना नगर पालिका प्रशासन डेंग्यूची साथ रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करतांना दिसत नाही. निर्जंतुकीकरणाची फवारणी नगर पालिकेकडून कायम बंद करण्यात आली आहे. शहरात धूर फवारणी केली जात नसल्याने विष्णूजन्य आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगर पालिकेने उपायोजना करण्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

साथीच्या रोगांमध्ये मागील काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. डेंग्यू सदृश्य आजाराची लागण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रुग्ण आजाराने फणफणत आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराने नुकताच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे ऐकायला मिळत आहे. शहरात डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ चिंता निर्माण करू लागली आहे. डेंग्यू सदृश्य आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र नगर पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होतांना दिसत नाही. नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे डेंग्यूसह मलेरिया व टायफाईडसारख्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. एवढेच नाही तर नागपूर येथे थैमान घातलेल्या चिकनगुनिया या आजाराचाही धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता नगर पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असतांना न.प. प्रशासन सुस्त बसलं आहे. डासअळी नाशक औषध व धूर फवारणी करण्याचा देखील नगर पालिकेला विसर पडला आहे. 

शहरातील काही भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारे व नाल्यांमध्ये घाण साचून राहत असल्याने विषाणूजन्य आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. मागील वर्षी विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी परिसरातील तब्बल ९ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. आताही डेंग्यूने पाय पसरायला सुरुवात केली आहे. तरीही नगर पालिका प्रशासन बेजबाबदारपणा दर्शवित आहे. साथीच्या रोगांची रोकथाम करण्याकडे दुर्लक्ष करून नगर पालिका प्रशासन एकप्रकारे शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळत आहे. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नगर पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांची साथ रोखण्याकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासियांमधून होऊ लागली आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी