राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश
प्रशांत चंदनखेडे वणी
गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक या अभियानातंर्गत शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन असंख्य युवक शिवसेना व युवासेनेत प्रवेश घेऊ लागले आहेत. संजय देरकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं असून वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला बळकटी देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यांच्या नेतृत्वात सध्या पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु असून वणी विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे घेतले जात आहे. शनिवार दि. ३१ ऑगस्टला शिवसेना (उबाठा) जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश केला. यावेळी संजय देरकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं.
संजय देरकर यांच्याकडून कार्यकर्ते जोडण्याला प्राधान्य दिले जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. ३१ ऑगस्टला शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज येसेकर यांनी संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात (उबाठा) जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबतच संदेश टिकट, हर्षल गूहे, भोला पांनघाटे, निकेश कडूकर, कार्तिक चांदेकर, चिंतन लोडे, निरक लोणारे, आर्या राऊत, प्रेम भटगरे, आशिष पिदुरकार, बादल येसेकर, धनराज मडावी, जावेद पठाण, सुजल जुमडे, कुणाल आगुलवार, हर्षल मडावी, संकेत विधाते, तेजस बागडे, आदित्य पाटिल, शेजल जुमडे यांनी देखील शिवबंधन बांधून घेत शिवसेना व युवासेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज येसेकर यांच्या पक्ष प्रवेशाने युवासेनेच्या संघटन बांधणीला बळकटी मिळणार आहे.
संजय देरकर यांच्या नेतृत्वात व अजिंक्य शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळयात शिवसेनेचे भगवान मोहिते, विनोद ढुमणे, चेतन उलमाले, मनीष बत्रा, साकेत भुजबळराव यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment