राजिव गांधी पंचायत राज संघटनेच्या प्रदेश सचिव पदी शालिनी रासेकर यांची निवड
प्रशांत चंदनखेडे वणी
माजी नगराध्यक्षा व काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या शालिनी रासेकर यांची राजिव गांधी पंचायत राज संगठनेच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. संगठनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिनाक्षी नटराजन यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रभारी नारायणसिंह राठोड व प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे यांनी शालिनी रासेकर यांना नियुक्तीपत्र दिले. शालिनी रासेकर या विवेकानंद प्राथमिक विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचं सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्या आजही राजकीय व सामाजिक क्षेत्रात तेवढ्याच तत्पर आहेत. त्यांची या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment