मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विवेकानंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा भाग दोन या उपक्रमांतर्गत कायर येथील विवेकानंद विद्यालयात स्काऊट गाईड कडून मंगळवार २७ ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, कु. सोनाली भोयर, शाळानायक मयूर खुटेमाटे, क्रिडानायक रोहन मडावी आदी उपस्थित होते. 

यावेळी १० वी च्या विद्यार्थिनी प्रणाली ताजने व सानवी चामाटे यांनी आपापले विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रक्षाबंधनाचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीचा पारंपरिक सण आहे. या दिवशी साधा धागा बांधून बहीण भावाला आपलं अतूट नातं जपण्याची व आपल्या नात्याचं रक्षण करण्याची ओवाळणी मागते. हा सण कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. तसेच त्यांनी भाषणातून स्काऊट व गाईड या विषयाचे शालेय जीवनातील महत्वही देखील पटवून सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सोनाली भोयर यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ओवाळून व राखी बांधून बहीण भावाचं स्नेहाचं नातं जोडतांनाच या पवित्र नात्याला जपण्याचं व बहिणीचं रक्षण करण्याचं व्रण मागितलं. त्यानंतर वंदे मातरम व पसायदान या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी