घरून बेपत्ता असलेल्या इसमाचा वणी भालर मार्गावर आढळला मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी भालर मार्गावरील हयात वीट भट्ट्याच्या विरुद्ध बाजूला रोडपासून काही अंतरावर नाल्याजवळ इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक इसमाची दुचाकी रोडवर उभी असून रोड पासून काही अंतरावर तो मृतावस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या केली, की काही अनुचित प्रकार घडला याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सदर इसम हा घरून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. त्याचा शोध सुरु असतांनाच आज २३ ऑगस्टला सकाळी त्याच्या मृतदेहच आढळून आला. मारोती जयंतराव कुचेवार (५०) रा. शास्त्री नगर असे या मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचे नाव आहे. 

सकाळी वणी भालर मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना हयात वीट भट्ट्याच्या विरुद्ध बाजूला नाल्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. नंतर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक हा तेथे बघणाऱ्यांपैकी काही लोकांच्या परिचयाचा निघाला. नंतर त्याची ओळख पटली. मारोती जयंतराव कुचेवार असे या मृतकाचे नाव असल्याचे समोर आले. तो मजुरीचे काम करायचा. मारोती हा घरून बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येते. त्याचा शोधाशोध सुरु असतांनाच आज निर्जनस्थळी त्याचा मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ माजली. त्याने आत्महत्या केली, की प्रकरण काही वेगळे आहे, याबाबत पंचक्रोशीत चर्चा रंगल्या आहेत. मृतदेहाजवळ काही कागदपत्र विखुरल्यागत पडल्याचे दिसून येत होते. त्याच्या हाताला मार लागल्याचे व त्यातून रक्तही वाहत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी