शिवसेना (उबाठा), युवासेना व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन कडून कोलकाता व बदलापूर येथील घटनेचा निषेध
प्रशांत चंदनखेडे वणी
बदलापूर येथील चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिनींवर शाळेतीलच एका नराधम सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून ४ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींना वासनेचा शिकार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याच्या मागणीला घेऊन मानवी संवेदना उफाळून आल्या आहेत. या लाजिरवाण्या घटनेमुळे परत एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे सरकार कडून महिलांच्या सन्मानार्थ लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. तर दुसरीकडे बहिणींच्या मुलींवर वाईट नजर ठेऊन असलेली हैवानी प्रवृत्ती त्यांच्या अब्रूवर हात घालत आहे. त्यामुळे सरकारवर आता टीकेची झोड उठू लागली आहे. शहरातही या मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनेचे पडसाद उमटले असून शिवसेना (उबाठा) शहर, तालुका व महिला आघाडी तसेच युवासेना व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने बदलापूरच्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. बदलापूर व कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोन्ही राज्यांच्या सरकार विरोधात तीव्र निदर्शने देण्यात आली. यावेळी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्यासह पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना ताजी असतांनाच बदलापूर येथे आदर्श शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींवर शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडल्याने जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. या मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. जनभावना तीव्र झाल्या असून नराधमाला फाशी देण्याची मागणी जनमांसातून होऊ लागली आहे. बदलापूर येथील आदर्श शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन विद्यार्थिनींवर तेथीलच एका सफाई कर्मचाऱ्याने शौचालयात नेऊन अत्याचार केला. विद्यार्थिनींच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता हा प्रकार उघडकीस आला. नंतर याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आल्यानंतर समाजशील व्यक्तिमत्वांनी हे प्रकरण उचलून धरले. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटायला लागले आहेत. महिलांवर दिवसागणिक होणाऱ्या अत्याचारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून नागरिकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. क्रूरकर्म्यांना व नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज शहरातही उमटले असून सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने कोलकाता व बदलापूर येथील अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना (उबाठा) शहर, तालुका व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील या निषेध आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दोन्ही राज्यांच्या सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. जोरजोरात निदर्शने देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच उपविभागीय अधिकारी यांना कोलकाता व बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता निवेदनही देण्यात आले. स्त्रियांच्या सन्मानाच्या बाता करणाऱ्या सरकार कडून स्त्रियांच्या सुरक्षेकरिता कुठल्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने आंदोलकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लाडक्या बहिणींच्या मुलींवर वासनांध नजरा खिळल्या जात असतांना सरकार कडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या शिक्षणप्रधान राज्यातही मुलींवर अत्याचार होऊ लागले आहेत. महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. तेंव्हा नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, शिवसेना (उबाठा) शहर, तालुका व महिला आघाडी तथा युवासेनेकडून करण्यात आली आहे.
या निषेध आंदोलनात सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण संजय देरकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक समिर लेनगुळे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, शिवसेना महिला आघाडी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या प्रणिता मो.असलम, ममता पारखी, सुनंदाताई गुहे, कीर्ती देशकर, वृषाली खानजोडे, मीनाक्षी मोहिते, अर्चना पिदूरकर, ममता पारखी, छबू असुटकर, प्रविणा काकरवार, स्मिता बुच्चे, सीमा काळे, निता मुळे, शारदा चिंतकुटलवार, संजिवनी खिरटकर, मंजु इनामे, सारीका थेरे, निता देठे, वैशालि देठे, सिमा बालगोनी, सपना आस्वले, सुरेखा ढेंगळे, वेणु झोडे, कांचन वानखेडे, दिशा फुलझेले, नमिता अडकिने, सोनाली भुसारी, वीणा तितरे, कांचन वाघमारे, विमला कश्यप, रेहाना सिद्दीकी, बबिता सिंह, शालिनी पंधरे, जया पथाडे, नंदा वांढरे, प्रणाली कुचनकर, प्रजापती क्षीरसागर, रेणू राणे, प्रमिला टेकाम, पुष्पलता महतो, निखिल काकडे, महेश उईके, श्रीकांत एकरे, धीरज ढेंगळे, श्रेयस डोंगरकर, चेतन उलमाले यांच्यासह शिवसेना (उबाठा) शहर, तालुका व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment