यावर्षीही अनुभवायला मिळणार विदर्भातील सर्वात उंच दहीहंडी फोडण्याचा थरार, मनसे कडून दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी
प्रशांत चंदनखेडे वणी
मोठ्या शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही दहीहंडी उत्सवाची प्रथा सुरु झाली आहे. ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम घेतले जातात. मनसेच्या वतीने यावर्षीही शासकीय मैदानाच्या भव्य पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे खास आकर्षण माधुरी पवार ही सिनेतारका असणार आहे. माधुरी पवार या सिने अभिनेत्रीला दहीहंडी उत्सवाकरिता मनसे कडून खास आमंत्रित करण्यात आले आहे. दहीहंडी स्पर्धेत भाग घेण्याकरिता महाराष्ट्रातून गोविंदा पथकं वणी येथे येणार आहेत. सर्वात उंच अशी दही हंडी फोडतांनाचा थरार शहरवासीयांना यावर्षी परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. मनसेकडून दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वात उंच अशी दहीहंडी फोडतांनाचा थरार अनुभवण्याकरिता व आनंदाच्या वातावरणात सहभागी होण्याकरिता उत्साहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment