कठीण परिस्थितीतही स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, किरण देरकर

प्रशांत चंदनखेडे वणी 

स्त्रियांना जेंव्हाही आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली तेंव्हा त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविली आहे. कर्तव्यनिष्ठता व कार्यकुशलतेतून त्यांनी प्रत्येकच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कठीण परिस्थितीतूनही स्त्रियांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. जिद्द व परिश्रमातून त्यांनी प्रत्येकच क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारीशक्ती ही प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धी तेजाने प्रतिभाशाली बनली आहे. कठीण काळातही स्त्रियांनी आपलं धेय्य गाठलं आहे. परिस्थितीवर मात करून तेजस्वी भरारी घेणारी स्त्रीच आपलं भाग्य उजळू शकते, असे मार्मिक विचार सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर यांनी व्यक्त केले. पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा "राज्यपाल" पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. लाठी येथील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांना पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा "राज्यपाल" हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा मान सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल एकविरा महिला पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा किरण देरकर या होत्या. तर सुरेखा ढेंगळे, प्रणिता मो.असलम शेख, शारदा चिंतकुंटलवार, वैशाली देठे, सीमा बालगोनी, सपना आस्वले, सारीका देरकर, शुभांगी टोंगे, माधुरी देरकर, दिशा फुलझेले, कांचन वाघमारे, कांचन वानखडे, सारीका थेरे, मंजु ईनामे, वेणु झोडे, स्नेहा लालसरे, निता देठे, सोनाली भुसारी, विमला कश्यप या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

वणी तालुक्यातील लाठी येथील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांनी गावपातळीवर कठीण परिस्थितीतही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पोलिस पाटील पदाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गावपातळीवर आपला कर्तव्यनिष्ठपणा सिद्ध करतांनाच त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या साहस, धाडस व शौर्य यासाठी त्यांची पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा "राज्यपाल" या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पोलिस पाटील पदाचा सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना राज्यपालाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे महसूल दिनाचे औचित्य साधून देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महिला पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने वणी तालुक्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. त्यामुळे त्यांचा एकविरा महिला पतसंस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस पाटील म्हणून आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या संजीवनी खिरटकर यांना हा पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी