आपल्या हातून पुण्यकर्म घडायचं असेल तर मानवसेवा हाच एकमेव मार्ग, विजय चोरडिया
प्रशांत चंदनखेडे वणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना सायकल व महिलांना साळी चोळीचे वाटप करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वातून विजय चोरडिया यांनी नेहमीच गरजू गरिबांना मदत केली आहे. दातृत्व भावना जपणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वणी विधानसभा क्षेत्रात ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी दिव्यांग बांधवांना सायकल तर माता भगिनींना साळी चोळी भेट दिली.
स्थानिक हनुमान मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते विजय चोरडिया हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल लांबट, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, अशोक सिंग, मनोज केळकर, मयूर गोयंका, राजू धावंजेवार, अनुप महाकुलकर, सागर मुने हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतांना विजय चोरडिया म्हणाले की, जनसेवा ही नेहमी माझ्या हातून घडावी, हा माझा सदैव प्रयत्न राहिला आहे. गरजू गरिबांना मदत करणं हे मी माझं भाग्य समजतो. राजकीय हेतू साध्य करण्याकरिता नाही तर सामाजिक ऋण फेडण्याकरिता गारवंतांना हरसंभव मदत करण्याचा माझा संकल्प राहिला आहे. माझ्या हातून निरंतर समाजसेवा घडावी हीच मी मनोकामना करतो. सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची शृंखला कधीही खंडित होऊ देणार नाही. निष्ठेने समाजकार्य करण्याची जी तळमळ आज आहे तीच यापुढेही राहील, यात तिळमात्रही फरक पडणार नाही. समाजातील प्रत्येक घटकांच्या मदतीसाठी माझा हात नेहमी पुढे राहील. लोकांना मदत करण्यातून जे समाधान मिळतं ते मी शब्दात मांडू शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढीदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल व माता भगिनींना साळी चोळी वाटप करून मी माझं केवळ सामाजिक उत्तरदायित्व पार पाडलं आहे. आपल्या हातून पुण्यकर्म घडायचं असेल तर मानवसेवा हाच एकमेव मार्ग आहे. आणि हे मानव सेवेचं कार्य करण्यास मी नेहमी कटिबद्ध राहील.
यावेळी सुरेश चामाटे, सुरज वाकुडकर, राजू महाकुलकर, बाबाराव कांबळे, संजय जिवतोडे, प्रफुल गिरी आदी दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तर अनेक माता भगिनींना साळी चोळी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मंगेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment