प्रेम विवाहात बंधलेल्या युवतीने गर्भावस्थेत घेतला गळफास


प्रशांत चंदनखेडे वणी 

प्रेम विवाहात बंधलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वणी तालुक्यातील परसोडा या गावात घडली. घरी कुणी नसतांना या तरुण विवाहितेने घराच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबातील सदस्य घरी परल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पायल गौरव उरकुडे (२१) असे या गळफास घेतलेल्या विवाहीतेचे नाव आहे. ३० सप्टेंबरला सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

एक वर्षापूर्वीच पायल हिचा गौरव उरकुडे या तरुणाशी प्रेम विवाह झाला होता. दोघांनी संसार थाटल्यानंतर अचानक असं काय घडलं की अवघ्या एका वर्षाच्या संसारातच तिने टोकाचा निर्णय घेतला. तिच्या उदरात गर्भ वाढत होता. काही दिवसांतच दोघांच्या संसार वेलीवर फुल उमलणार होतं. ती सात महिन्यांची गर्भवती असतांना देखील तिने ममतेचा गळा घोटून मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. गौरव उरकुडे याच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने ते दोघेही भाड्याच्या घरात राहत होते. त्या घरातच तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. प्रेमातून विवाहात बंधलेल्या आणि नंतर संसारात रममाण झालेल्या युवतीने नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याने प्रेमविवाहाचा शेवट अतिशय दुःखद झाला. घरी कुणी नसतांना विवाहित युवतीने टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर पायल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नंतर घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोटातील बाळाचा विचार न करता पायल हिने असा हा टोकाचा निर्णय का घेतला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी