शनिवारी शहरात प्रख्यात व्याख्याते सोपानदादा कनेरकर यांचं व्याख्यान


प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते, प्रखर विचारवंत, कीर्तनकार व प्रबोधनकार सोपानदादा कनेरकर यांचं युवकांना उज्वल भविष्याची प्रेरणा देणारं व्याख्यान शहरात आयोजित करण्यात आलं आहे. पारसमल प्रेमराज फाउंडेशन व विजय चोरडिया मित्र परिवाराच्या वतीने शनिवार दि. २८ सप्टेंबरला दुपारी १ वाजता स्थानिक शेतकरी मंदिर सभागृहात हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवकांच्या उज्वल भविष्याकरिता उत्तम मार्गदर्शन व पालकांची भूमिका या विषयावर युवा कीर्तनकार सोपानदादा करणेकर हे प्रबोधन करणार आहेत. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक दायित्व जपणारे विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या प्रबोधनातून सकारात्मक विचारांची मांडणी करणाऱ्या त्यांच्या या व्याख्यानाचा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विजय चोरडिया मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे. 

सोपानदादा कनेरकर हे आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करतात. युवावर्ग त्यांच्या प्रबोधनाने प्रभावित झाला आहे. युवकांच्या उज्वल भविष्याचं सार सांगणारं त्यांचं व्याख्यान ऐकण्याकरिता युवावर्ग नेहमी उत्सुक असतो. सोपानदादा कनेरकर यांच्या किर्तनातून प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांच्या प्रबोधनाचा येथीलही युवा पिढीला प्रत्यक्ष लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात तत्पर असलेल्या विजय चोरडिया यांनी सोपानदादा करणेकर यांच्या व्यख्यानाचा कार्यक्रम वणी शहरात आयोजित केला आहे. यशस्वी जीवनाचं मूलमंत्र सांगणारं व जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारं त्यांचं हे व्याख्यान वणीकरांसाठी प्रबोधनाची एक पर्वणीच असणार आहे. तेंव्हा तरुण व युवापीढीने तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या व्याख्यानाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया व मित्र परिवाराने केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी