सार्वजनिक ठिकाणी राडा घालणाऱ्या दोन गटातील सात तरुणांना अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

मद्यपी तरुणांच्या दोन गटांत गुरुवारी मध्यरात्री तुफान राडा झाल्याची घटना घडली. शहरातील सेवानगर येथून घोन्साकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा राडा झाला. सार्वजनिक ठिकाणी राडा घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोनही गटातील सातही तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर घोळक्याने येऊन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील सेवानगर व शहरालगत असलेल्या रासा येथील तरुणांच्या दोन गटात गुरुवार दि. १९ सप्टेंबरला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास प्रचंड राडा झाला. दोनही गटातील तरुणांनी एकमेकांना जबर मारहाण केली. सेवानगर ते घोन्सा रोडवर तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी सुरु असल्याची माहिती रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे पोलिसांना दारूच्या नशेत झिंगलेले तरुण एकमेकांना मारहाण करतांना आढळले. या मारहाणीत काही तरुण जखमीही झाले होते. दोनही गटातील तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना राडा घालण्याचे कारण विचारले असता दारू पियुन घरासमोर उलटी केल्याच्या कारणावरून हा राडा झाल्याचे पोलिसांच्या चौकशीतुन समोर आले. सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री दारूच्या नशेत राडा घालून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणाऱ्या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम १९४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अंकुश क्रिष्णा मोगरे (२५ ), हरशू संजय बिसमोरे (२२ ), दोघेही रा. सेवानगर वणी, ओम अनिल बिजलवार (२०) रा. टागोर चौक वणी (तरुणांचा एक गट), रजनीकांत बालाजी वल्लरवार (३३), जगसाई नामदेव सुरपाम (२०), अभिषेक मारोती बदकी (१९), प्रज्योत कवडू सोनटक्के (२२) सर्व रा. रासा ता. वणी (तरुणांचा दुसरा गट) यांचा समावेश आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी