शिकवणी वर्गाकरिता घरून निघालेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर (ईजारा) येथील रहिवाशी असलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना १६ सप्टेंबरला उघडकीस आली. वणी येथे शिकवणी वर्गाला जाण्याकरिता निघालेला हा अल्पवयीन मुलगा नंतर घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध अमोल गवळी (१७ वर्षे ८ महिने) असे या बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील एका महाविद्यालयात १२ वीत शिकणारा हा अल्पवयीन मुलगा विठ्ठलवाडी परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवणी वर्गाकरिता यायचा. १६ सप्टेंबरलाही अनिरुद्ध हा नेहमी प्रमाणे शिकवणी वर्गाकरिता घरून निघाला. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी न परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय चांगलेच काळजीत आले. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर शेवटी त्याच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. तसेच त्यांनी मुलाला कुणी तरी पळवून नेल्याचाही संशय तक्रारीतून व्यक्त केला आहे.
अमोल रविंद्र गवळी हे ऑटोचा व्यवसाय करतात. ते राजूर (ई) येथे आपल्या परिवारासह राहतात. त्यांचा मुलगा अनिरुद्ध हा वणी येथील एका महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण घेत असून तो विठ्ठलवाडी परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवणी वर्गाकरिता देखील यायचा. नेहमी प्रमाणे शिकवणी वर्गाकरिता घरून निघालेला अनिरुद्ध हा बराच उशीर होऊनही घरी न परतल्याने वडिलांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम १३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अल्पवयीन मुलाचा शोध घेतला जात आहे.
Comments
Post a Comment