भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरवडा अंतर्गत शहरात आज भव्य निःशुल्क आरोग्य शिबीर

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय जनता पार्टी द्वारा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुषंगाने भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने रविवार दि. २२ सप्टेंबरला नांदेपेरा मार्गावरील लॉयन्स इंग्लिश मिडीयम शाळेत भव्य निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत चालणार आहे. शिबीर स्थळावरच रुग्णांना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. शिबिरात सर्वच आजारांचे निदान व त्यावर उपचार करण्यात येणार आहे. तेव्हा या शिबिराचा जनतेने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे. 

विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) जि. वर्धा यांच्या सहकार्यातून आयोजित या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना जडलेल्या गंभीर व अति गंभीर आजारांचे निदान लावून त्यावर उपचार करण्यात येणार आहे. महिलांच्याही विविध आजारांचे निदान लावून त्यावरही उपचार करण्यात येणार आहे. धकाधकीच्या या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नसल्याने त्यांच्यात आंतरिक आजार बळावू लागले आहेत. वेळेत तपासणी व आजाराचे निदान लागत नसल्याने हे आजार नंतर गंभीर रूप धारण करतात. त्यामुळे जनतेला आपल्या आरोग्याची तपासणी करता यावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या विद्यमातुन सेवाभावी उपक्रमांतर्गत हे निःशुल्क भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 

या शिबीरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडधड करणे यासह डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड),  मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार, हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घश्याचे सर्व आजार, संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार,  दमा, बरेच दिवसाचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी आजारावर मोफत तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तसेच भरती रुग्णांच्या सर्व सामान्य चाचण्या (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) तथा महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी व त्यावर उपचार केले जाईल. त्याचबरोबर अतिविशिष्ट चाचण्या (CT Scan, MRI इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार करण्यात येतील. त्यामुळे या भव्य आरोग्य शिबराचा जनतेने मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी