घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान न मिळाल्याने फाल्गुन गोहोकार करणार बेमुदत उपोषण


 
प्रशांत चंदनखेडे वणी 

शासनाच्या विविध योजनेंर्तगत तालुक्यातील गोरगरीब जनतेला घरकुलाचा लाभ मिळूनही त्यांना अनुदानाचा दुसरा व तिसरा टप्पा अद्यापही न मिळाल्याने त्यांच्या घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे घरकुलधारकांनी आपल्या व्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याकडे मांडल्या. फाल्गुन गोहोकार यांनी यासंदर्भात सातत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. वेळोवेळी पत्र व्यवहारही केले. मात्र अद्यापही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. घरकुलधारकांना अनुदानाचा दुसरा व तिसरा टप्पा न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा फाल्गुन गोहोकार यांच्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार फाल्गुन गोहोकार हे अनुदानापासून वंचित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसोबत ३० सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

शासनाकडून गोरगरिबांना हक्काचं घर बांधता यावं म्हणून अनुदान देण्यात येतं. त्याकरिता शासनाकडून विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. वणी तालुक्यात शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थी आहेत. घरकुलासाठी पात्र ठरलेल्या बहुतांश लाभार्थ्यांना केवळ अनुदानाचा पहिलाच टप्पा मिळाला आहे. उर्वरित अनुदान मात्र अद्याप मिळलेले नाही. त्यामुळे त्यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी घराचे पक्के बांधकाम करण्याकरिता आपली राहती घरे खोलली. मात्र त्यांना अनुदानाचा पहिलाच टप्पा मिळाला. अनेक महिने लोटूनही त्यांना उर्वरित अनुदान मिळाले नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात त्यांच्यावर विपरीत परिस्थिती ओढवली. प्रशासनाला वारंवार निवेदने, अर्ज व पाठपुरावा करूनही लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान देण्यासंदर्भात कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांच्या न्यायाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे उर्वरित अनुदान न मिळाल्याने ३० सप्टेंबर पासून कार्यकर्ते व लाभार्थ्यांसोबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सांगितले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी