तरुणाला मारहाण करणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे आपल्या मामीच्या घरी झोपून असलेल्या रोशन साहेबराव राऊत (२१) रा. घोडेप्लॉट काटोल जि. नागपूर ह.मु. कुंभा याला गावातीलच दोघाजणांसह चौघांनी संगनमत करून लाथा बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत तरुणाच्या तोंडाला जबर मार लागला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पिंटू शेंदरे (३५), मिलन निहारे (३१) दोघेही रा. टेंबा ता. हिंगणघाट जि. वर्धा, सुनिल जगताप (३५), अनिल जगताप (३२) दोघेही रा. कुंभा ता. मारेगाव जि. यवतमाळ अशी या गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींवर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३५२, ३५१(३), ३५१(२), ३(५), ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment