धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता प्रदीप बांदूरकर याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रशांत चंदनखेडे वणी 

धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता प्रदीप बांदूरकर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🥀🎕🥀

सामाजिक कार्यात रमलेला हा धेय्य वेडा युवक प्रदीप बांदूरकर. समाजकार्यात त्याने स्वतःला वाहून घेतले. समाजहिताचे कार्य करण्यात तो नेहमी पुढाकार घेतो. सामाजिक कार्यकर्ता ही त्याची ओळख. सामाजिक कार्यात त्याचा हथकंडा राहिला. सामाजिक कार्याची त्याला प्रचंड तळमळ. राजूर या चळवळीच्या गावात तो लहानाचा मोठा झाला. या गावातील प्रखर व्यक्तिमत्वांच्या कार्याने तो भाळला. सामाजिक चळवळीत ख्याती असलेल्या राजूर या गावाचा आदर्श त्याने जपला. यातूनच त्याला प्रेरणावाट मिळाली. विद्यार्थीदशेपासूनच तो सामाजिक कार्यात अवतरला. कालांतराने सामाजिक कार्याचा पगडा त्याच्यावर निर्माण झाला. जनकार्यात त्याने स्वतःला झोकून दिले. जनतेची कामे करण्यात तो रममाण झाला. त्यानंतर गावगाड्यातील समस्या व प्रश्न तो उचलायला लागला. गावातील समस्या सोडविण्याकरिता पुढाकार घेऊ लागला. ग्रामपंचायती पुढे गावातील समस्या मांडू लागला. त्यानंतर गावातील लोकं समस्या व कामे घेऊन त्याच्यापर्यंत येऊ लागले. आणि यातूनच कार्य कर्तृत्वाने तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावारूपास आला. राजूर या गावात त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. तरुणांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनाच तो हक्काचा वाटू लागला. नंतर अख्ख गाव त्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखू लागलं. 

प्रदीप बांदूरकर हा जेमतेम परिस्थितीतून उभरलेला युवक. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्याचं राजूर या गावातच झालं. महाविद्यालयीन शिक्षण त्यानं वणी येथे घेतलं. विद्यार्थीदशेपासूनच त्याला समाजकार्याची मोठी ओढ. हळूहळू तो समाजकार्याकडे आकर्षित झाला. नंतर झपाटल्यागत समाजकार्य तो करू लागला. गावातील समस्यांना वाचा फोडण्याचं काम त्याने हाती घेतलं. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता तो पुढाकार घेऊ लागला. नागरिकांची अडली नडली सर्वच कामे तो प्रखरतेने करायचा. गावात सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामपंचायतीवरही तो दबाव आणण्याचा. ग्रामपंचायतीला गावातील समस्या सोडविण्यास भाग पाडायचा. अशातच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रदीपला राजकीय पदाची ऑफर मिळाली. राजकीय पद मिळाल्यास आणखी उत्तम पद्धतीने कार्य करता येईल या उद्देशाने त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला. त्याला राजूर विभाग प्रमुख पद देण्यात आलं. नंतर त्याने आक्रमकपणे कार्य केलं. गावाच्या विकासाचे मुद्दे तो उपस्थित करू लागला. ग्रामपंचायतीला अल्टिमेटम देऊन त्याने गावातील विकासकामे करून घेतली. नागरिकांचे प्रश्न व गावातील समस्या सोडविण्याकरिता नेहमी त्याने आक्रमक भूमिका घेतली. आजही तो तेवढ्याच तत्परतेने सामाजिक कार्य करतो आहे. 

सामान्य ते असामान्य व्यक्तिमत्वापर्यंतचा त्याचा प्रवास आदर्श घेण्याजोगा आहे. जनकार्य करतांना त्याने जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. स्वच्छ प्रतिमा ठेऊन त्याने समाजकार्य केलं. राजकारणातही त्याने उलट सुलट कामे केली नाहीत. नागरिकांच्या हक्कासाठीच तो लढला. अशातच त्याला ग्रामपंचायत निवडणूक लढण्याकरिता नागरिकांनी समर्थन दिले. पण निवडणुक रिंगणात उतरल्यानंतर अगदी जवळच्याच व्यक्तीने त्याला दगा दिला. अवघ्या १० मतांनी त्याचा पराभव झाला. नंतर त्याने त्या राजकीय पक्षाला सोडचिट्ठी दिली. पण समाजकार्यात मात्र खंड पडू दिला नाही. आजही लोकांची कामे तो तेवढ्याच प्रखरतेने करतो. जेंव्हा कुणी हाक दिली तेंव्हा तो उभा होतो. अनेकांची कार्यालयीन कामे तो करून देतो. प्रशासनाकडून अडलेली कामेही तो मार्गी लावतो. गावातील समस्याही हाताळण्याचा तो प्रयत्न करतो. नागरिक आजही त्याच्याकडे हक्काने समस्या व प्रश्न घेऊन येतात. जनसामान्यांच्या हक्काचा माणूस ठरलेला प्रदीप बांदूरकर हा आजही समाजकार्याची धुरा तेवढ्याच ताकदीने वाहतो आहे. 

या समाजशील व्यक्तिमत्व जपणाऱ्या प्रदीप बांदूरकर याचा आज वाढदिवस. त्याला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा !


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी