दारूच्या नशेत आरडाओरड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रशांत चंदनखेडे वणी
ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून २६ सप्टेंबरला पोहेका गजानन डोंगरे हे पोलिस पथकासह शहरात गस्तीवर असतांना त्यांना जिल्हा परिषद कॉलनी येथे सार्वजनिक ठिकाणी एक युवक दारूच्या नशेत जोरजोरात आरडाओरड करतांना आढळून आला. त्याला पोलिस पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने महेंद्र नानाजी राजूरकर असे सांगितले. तो अति मद्य सेवन करून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्या तोंडाचाही प्रचंड दारूचा वास येत होता. त्यामुळे त्याची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यातही त्याने मद्य सेवन केले असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालावरून पोलिसांनी त्याच्यावर मदकाच्या कलम ८५ (१) नुसार गुन्हा दाखल केला. महेंद्र राजूरकर हा एका राजकीय नेत्याच्या घरसमोर जोरजोरात आरडाओरड करीत असल्याने त्याच्यावर कार्यवाही करण्यात आल्याचे समजते. ही कार्यवाही पोहेका गजानन डोंगरे व पोलिस पथकाने केली.
Comments
Post a Comment