गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ऑटो उलटला

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील बाबापुर (कायर) येथे गणपतीच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांचा ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या तर आठ भाविकांना किरकोळ मार लागल्याची घटना रविवार दि. १५ सप्टेंबरला रात्री ८  वाजताच्या सुमारास वेळाबाई मोहदा मार्गावर घडली. ऑटो पलटी होताच मोहदा गावातील युवकांनी घटनास्थाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. 

बाबापुर (कायर) येथील गणपती अतिशय प्रसिद्ध आहे. भक्तांना पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. येथील गणपतीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात. गणेश उत्सवादरम्यान याठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते. झरी जामणी तालुक्यातील मांगली (मुकुटबन) येथील भाविकही बाबापुर येथील गणपतीच्या दर्शनासाठी येत असतांना त्यांचा ऑटो वेळाबाई मोहदा मार्गावर उलटला. या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. अशातच रात्रीच्या वेळेला ट्रकचा लाईट डोळ्यावर पडल्याने ऑटो चालकाला रोडवरील खड्डा दिसला नाही, व ऑटो (MH २९ M ६६२३) खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात ऑटो मधील सुजाता पाटील व लक्ष्मीबाई ढोके या दोन भाविक महिला गंभीर जखमी झाल्या तर ऑटो चालकासह आठ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना मोहदा येथील युवकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या बांधकामासाठी मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीतून किमान रस्त्यावरील खड्डे तरी बुजविण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी