संजय देरकर यांच्या पुढाकाराने सुटला शेतकऱ्यांचा शेत सिंचनाचा प्रश्न, २४ तासांत बदलून मिळाले बंद अवस्थेतील ट्रान्सफार्मर
प्रशांत चंदनखेडे वणी
झरी जामणी तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये अनेक समस्या असून प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना विविध समस्यांशी झुंजावे लागत आहे. चालबर्डी या गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मागिल दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असतांना देखील महावितरणने ट्रान्सफार्मर बदलून देण्याचं सौजन्य दाखविलं नाही. अशातच शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर हे झरी जामणी तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधण्याकरिता गेले असता त्यांनी चालबर्डी या गावाला भेट दिली. त्यावेळी चालबर्डी या गावातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडतांना वीज वितरण कंपनीने कृषी पंपाकरिता बसवून दिलेल्या डीपीतील ट्रान्सफार्मर मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने शेत पिकांना पाणी देणे कठीण झाले असल्याचे संजय देरकर यांना सांगितले. संजय देरकर यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना चांगलेच खडसावले. तेंव्हा महावितरणने वेगवान हालचाली करीत दोन वर्षांपासून बंद असलेला ट्रान्सफार्मर २४ तासांत बदलून दिला. आणि शेतकऱ्यांची शेत सिंचनाची समस्या सुटली. संजय देरकर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गावकऱ्यांकडून संजय देरकर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
झरी जामणी हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोइ सुविधांचा मोठा अभाव आहे. गावकऱ्यांना आजही अनेक समस्यांशी झुंजावे लागत आहे. प्रशासनही या गावातील समस्या सोडविण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. शासनाच्या बहुतांश योजना गावकऱ्यांपर्यंत पोहचतच नसल्याने त्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याची वास्तविक परिस्थिती आहे. काही गावात अजूनही धड रस्ते नाही. खडतर रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडं झुडपं वाढली आहेत. या गावात चारचाकी वाहन नेतांना मोठी कसरत करावी लागते. गावकऱ्यांच्या व्यथा कुणी जाणून घ्यायला तयार नाही. झरी जामणी तालुक्यातील बहुतांश गावं आजही विकासापासून कोसो दूर राहिली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचं झणझणीत वास्तव म्हणजे चालबर्डी गावातील कृषी पंपांना विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असतांना प्रशासनाने याची दखल घेतली नाही. कास्तकारांच्या शेत सिंचनाचे प्रश्न निर्माण होऊनही महावितरणने ट्रान्सफार्मर बदलून दिला नाही. झरी जामणी पासून अवघ्या ३ किमी अंतरावर चालबर्डी हे गाव आहे. झरी जामणी येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही शहराला लागूनच असलेल्या या गावातील ट्रान्सफार्मर बदलून देण्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
अशातच शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर हे २५ सप्टेंबरला झरी जामणी तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधण्याकरिता गेले असता त्यांनी चालबर्डी या गावाला भेट दिली. त्यावेळी गावकऱ्यांनी संजय देरकर यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. संजय देरकर यांनी त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी गावातील समस्या सांगतानाच शेत शिवारातील डीपीतील ट्रान्सफार्मर मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने शेत पिकांना पाणी देणे कठीण झाले असल्याचे संजय देरकर यांना सांगितले. यावरून संजय देरकर यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना चालबर्डी शेत शिवारातील डीपीतील ट्रान्सफार्मर तात्काळ बदलून देण्यास सांगितले. संजय देरकर यांनी संपर्क साधताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेगवान हालचाली करीत वीज कर्मचाऱ्यांना पाठवून अवघ्या २४ तासांत ट्रान्सफार्मर बदलून दिले. संजय देरकर यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपासून बंद असलेले ट्रान्सफार्मर २४ तासांत बदलून मिळाल्याने गावकऱ्यांमधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी चालबर्डी ग्रामवासियांनी संजय देरकर यांचा स्वागत सत्कार केला. संजय देरकर यांच्यासोबत यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment