वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व सर्वसामान्यांच्या विविध समस्या व ज्वलंत प्रश्नांना घेऊन आज १५ ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धरणे आंदोलनात शासनाच्या फसव्या धोरणांचा तीव्र निषेध करतांनाच शासन व प्रशासनाविरुद्ध तीव्र नारेबाजी करण्यात आली.  

निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करावेत. कापसासाठी ₹10000 व सोयाबीनसाठी ₹9000 भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांमुळे उद्भवणारी समस्या कायमस्वरुपी सोडविण्यात यावी, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये 2019 नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. या मागण्यांना घेऊन काँग्रेसच्या वतीने हे तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या सर्व मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. 

दुपारी 12 वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मतदानातूनच उत्तर द्या - संजय खाडे

वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या समस्यांवर वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे कायम दुर्लक्ष केले. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनतेनी मतदानातूनच चोख उत्तर द्यावे. 

आंदोलनात मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, जयसिंग गोहकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निखुरे,  अशोक पांडे, अशोक चिकटे, पवन एकरे, साधना गोहोकर, अल्का महाकुलकर,  संगीता खाडे, अनिल भोयर, उत्तम गेडाम, वंदना दगडी, अजय धोबे, काजल शेख, अनंता डंभारे, संदीप ढेंगळे, रुद्रा कुचणकर, प्रशांत गोहोकार, अरविंद वसनोर, प्रफुल थेरे, सागर बोबडे, अमोल झाडे, प्रमोद लोणारे, गजानन शळके, रोहन आसुटकर, नरेंद्र लोणगाडगे, सचिन आसुटकर, प्रदीप खेकारे, अशोक नागभिडकर, कविता चटकी, रवी कोटावर, प्रफुल उपरे, रघुवेंद्र कुचनकर, सुरेश रायपुरे, सुरेश बनसोडे, कैलास पचारे, अरुण नागपुरे, नारायण गोडे, राजू मालेकर, समाधान कुंघटकर, संजय सपाट, मनोज खाडे, बंडू खिरटकर, मुरलीधर ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी व नागरिक शेकडो संख्येमध्ये उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी