संताजी एक शाखीय तेली समाजाचा पारिवारिक संमेलन सोहळा संपन्न
प्रशांत चंदनखेडे वणी
संताजी एक शाखीय तेली समाजाचा कोजागिरी निमित्ताने पारिवारिक स्नेहमिलन सोहळा बाजोरिया लॉन वणी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि बेलुरकर हे होते. कार्यक्रमाला तानाजी पाऊनकर, बाबाराव खांदनकर, माजी नगरसेवक संतोष डंभारे, गिता पिपराडे, स्मिता डवरे आदी समाजातील जेष्ठ मान्यवर मंडळी उपस्थित होती.
आज आपला समाज एकत्र करून हे पारिवारिक संमेलन आयोजित केले. समाज बांधवंना यापुढे ही कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणू अशी इच्छा अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी व्यक्त केली. यावेळी गिता पिपराडे व सीमा डवरे यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात एकुण 145 कुटुंबासह 600 समाजबांधव उपस्थित होते. यावेळी परिवाराचा परीचय घेण्यात आला. तसेच महिला व लहान मुलांसाठी काही मनोरंजक खेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये बक्षीसही देण्यात आल्याने त्यांच्या उत्साहात आणखीच भर पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लिचोडे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मी पाटील तर आभारप्रदर्शन कैलास पिपराडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे संतोष डंभारे, विलास क्षिरसागर, विजय पिपराडे, गजानन पाटील, रविंद्र लिचोडे, पंढरीनाथ बोरपे, देवेंद्र गोबाडे, विशाल ठोंबरे,राजु पाटील, आशिष डंभारे, सचिन डवरे, अमन क्षिरसागर यांनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment