युवा शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट, सणासुदीच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठी नैराश्यच


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथील युवा शेतकऱ्याने नैराश्येतून विषाचा घोट घेत जगाचा निरोप घेतला. सणासुदीच्या काळात या युवा शेतकऱ्याने विवंचनेतून मृत्यूला कवटाळले. शेतातच त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्याला तात्काळ कोरपना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. किशोर अण्णाजी देठे वय अंदाजे ३५ वर्षे असे या विषाचा घोट घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका व मिळणारी तुटपुंजी मदत यामुळे शेतकरीवर्ग प्रचंड नैराश्येत आला आहे. नैराश्येतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे. आस्मानी व सुलतानी संकटाने तो घायाळ झाला आहे. ढाकोरी (बोरी) येथे परिवारासह वास्तव्यास असलेला किशोर देठे हा युवा शेतकरी आपली वडिलोपार्जित शेती वाहून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. आज २७ ऑक्टोबराला सकाळी तो नेहमी प्रमाणे शेतात गेला. आणि शेतातच त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी तात्काळ त्याला कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घरातील कर्त्या पुरुषाने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंब दुःख सागरात बुडालं आहे. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी