नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवक
प्रशांत चंदनखेडे वणी
मृतक हा काही वर्षांपासून भिमनगर येथे सासरी राहत होता. बंडू दुर्गे यांचा तो जावई होता. तो कलर पेंटिंगची कामे करायचा. त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरु होते. बांधाकाम सुरु असलेल्या घरातच रात्री खिडकीच्या ग्रीलला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चेतून हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे. उज्वल कांबळे याच्या पश्च्यात पत्नी, दोन छोटी मुले असा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालातून ते स्पष्ट होणार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment