हजारो समर्थकांच्या उपस्थितीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दाखल केला नामांकन अर्ज
प्रशांत चंदनखेडे वणी
संजीवरेड्डी बोदकुरवार हे आज नामांकन अर्ज दाखल करणार असल्याने वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पावले शहराकडे वळताना दिसली. सकाळपासूनच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची शहरात गर्दी दिसून आली. आमदार बोदकुरवार यांचे वणी विधानसभा क्षेत्रातील समर्थकही हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या समर्थनार्थ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जोश व उत्साह दिसून येत होता. भाजप समर्थकही उस्फुर्तपणे मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती.
Comments
Post a Comment