दरोड्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात, तीन वर्षांपासून पोलिसांना देत होता हुलकावणी
प्रशांत चंदनखेडे वणी
सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला हा आरोपी मागील तीन वर्षांपासून फरारीत होता. शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला होता. मात्र नौशाद कुरेशी हा अट्टल चोरटा त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. तेंव्हा पासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र वेळोवेळी तो पोलिसांना हुलकावणी देत होता. परंतु गुन्हेगारांना लपलेल्या बिळातून शोधून काढण्यात तरबेज असलेले ठाणेदार माधव शिंदे यांचे हात शेवटी आरोपी पर्यंत पोहोचलेच. २३ ऑक्टोबरला शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना ठाणेदार माधव शिंदे यांना आरोपीबाबत खात्रीदायक माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सपोनि रावसाहेब बुधवंत यांना पोलिस पथकासह आरोपीला अटक करण्याकरिता पाठविले. रावसाहेब बुधवंत यांनी घुग्गुस येथे जाऊन मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. दरोड्याच्या प्रयत्नात पसार झालेला नौशाद कुरेशी हा शिरपूर पोलिसांच्या रडार होता. मागील तीन वर्षांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. परंतु कित्येक शातीर आरोपींना शोधून काढणाऱ्या ठाणेदार माधव शिंदे यांच्या करड्या नजरेपासून तो वाचू शकला नाही. शेवटी ठाणेदार माधव शिंदे यांना तो लपून असलेल्या बिळाची माहित मिळाली व पोलिसांनी या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी नौशाद कुरेशी याच्यावर भादंविच्या कलम ३९९, ४०२ व सहकलम ४/२५ आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्था. गु. पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहवा सुनील दुबे, विनोद काकडे, पोकॉ पंकज कुडमेथे यांनी केली.
Comments
Post a Comment