भिमनगर येथील युवकाची आत्महत्या नसून तो खूनच, प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून झाले स्पष्ट

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील भिमनगर येथे नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या युवकाचा खून झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून पुढे आले आहे. युवकाची आत्महत्या नसून त्याचा खून झाल्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उज्वल चरणदास कांबळे (३०) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृतक उज्वल कांबळे हा बंडू दुर्गे यांचा जावई होता. तो मागील काही वर्षांपासून भीमनगर येथे स्थायिक झाला होता. कलर पेंटिंची कामे करून तो आपला प्रपंच चालवायचा. त्याच्या नवीन घराचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं होतं. अशातच २७ ऑक्टोबरला रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास नवीन बांधकाम सुरु असलेल्या घरात खिडकीच्या ग्रीलला खुर्चीवर बसून गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगायला लागल्या. मृतकाच्या गळा व मानेवर व्रण आढळल्याने पोलिसांचाही संशय बळावला होता. शेवटी प्राथमिक शवविच्छेदन अहवालात युवकाची आत्महत्या नसून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

मृतक उज्वल कांबळे हा मुळचा नागपूर येथील रहिवाशी होता. काही वर्षांपूर्वी तो भिमनगर येथे सासरी राहण्यास आला. नंतर तो येथेच स्थायिक झाला. कलर पेंटिंगची कामे करून तो आपला व आपल्या परिवाराचा उदर्निवाह करायचा. संसारिक जीवनाचा सारीपाट सुरु असतांना नवीन घरातच त्याचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचं अवलोकन केल्यानंतर खुनाच्या दिशेने तपास सुरु केला. मृतदेह अगदीच संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलिसांनी प्राथमिक शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय खरा निघाला. उज्वल कांबळे याची हत्या करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आता युवकाचा खून झाल्याचे प्राथामिक शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट आहे. त्यामुळे खुनाच्या रहस्यावरून आता लवकरच पडदा उठणार आहे. युवकाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण मिळाल्याने युवकाच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांवर बीएनएसच्या कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी