वातावरणाचाही रंग बदलेल, जेंव्हा संजय देरकर यांचा ताफा मैदानात उतरेल ! उद्या घडेल शक्ती प्रदर्शनाचं भव्य दर्शन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा क्षेत्रातील संयमी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे संजय देरकर यांनी अगदीच संयमाने उमेदवारी आपल्या पारड्यात पाडून घेतली. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी आपला पूर्ण अनुभव पणाला लावला. आपलं कार्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी खेचून आणली. महाविकास आघाडीत वणी मतदार संघावरून कमालीची रस्सीखेच सुरु होती. वणी मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाईल, या चर्चेने रान उठलं होतं. सेना की काँग्रेस हा कुतूहल निर्माण झालेला असतांनाच वणी मतदार संघ शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच शिवसेनेकडून संजय देरकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. शिवसेना वणी विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केली. शिवसेना वणी विधानसभा क्षेत्राचं कुशल नेतृत्व म्हणून पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविला. वणी मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय देरकर हे उद्या २९ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांसह ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीकडून भव्य शक्ती प्रदर्शनही करण्यात येणार आहे. तसेच हजारो समर्थकांसह शहरातून मिरवणूक काढून संजय देरकर हे आपला नामांकन अर्ज दाखल आहेत.

वणी मतदार संघात बदल घडवून आणण्याचा संकल्प घेऊन संजय देरकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वणी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चेबांधणी केली आहे. कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत केलं आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) बळकट करण्याकरिता त्यांनी कठोर मेहनत घेतली आहे. विधानसभेच्या चार पंचवार्षिक निवडणुका लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी दरवेळी निवडणुकीत मतांची चांगलीच गोळा बेरीज जुळवली. आता महाविकास आघाडीची ताकद पाठीशी असल्याने विजयाचा गुलाल उधळायचाच हा निर्धार त्यांनी केला आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे या मतदार संघात असंख्य समर्थक आहेत. पक्षाचेही कार्यकर्ते निष्ठावान आहेत. महाविकास आघाडीचेही संघटन पाठीशी आहे. त्यांची या मतदार संघात छबीही चांगली असल्याने त्यांना नेहमी जनतेचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांचं मनोबल उच्च शिखरावर आहे. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची जनतेतून त्यांना पावती मिळेल, अशी त्यांना आशा आहे. त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकून उमेदवारी बहाल केल्याने या संधीचं सोनं करण्याचा त्यांचा संकल्प दिसून येत आहे. उद्या २९ ऑक्टोबराला भव्य रॅली काढून ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत ते रणशिंग फुंकणार आहेत. जनतेचा आशीर्वाद घेऊन ते पुढील कार्याला सुरुवात करणार आहेत. वणी मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून ते नामांकन अर्ज दाखल करणार असल्याने उद्या शहर गजबजून उठणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तशी तयारीही केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी