भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून तिघांनाही पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. हा अपघात शनिवार दि. २६ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील मलिक चिकन सेंटर पासून काही अंतरावर घडला. पती, पत्नी व मुलगी दुचाकीने वरोऱ्याला जात असतांना भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कुटुंबातील तीनही जण गंभीर जखमी झाले आहेत. मलिक चिकन सेंटर जवळच पोलिस चेक पोस्ट उभारण्यात आलं आहे. त्यामुळे अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले. महिलेच्या पायाला तर मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

वणी येथे कार्यक्रमासाठी आलेलं हे कुटुंबं कार्यक्रम आटपून वरोरा येथे परतत होतं. दरम्यान वणी वरोरा मार्गावरील मलिक चिकन सेंटर जवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीनही जण गंभीर जखमी झाले आहेत. राजिक गफूर शेख (३४) हे वणी येथील मेघा ईण्डेन गॅस एजन्सीमध्ये काम करतात. गोकुळनगर येथे गफूर शेख यांच्याकडे कार्यक्रम असल्याने ते परिवारासह कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पत्नी व मुलीसह मोटारसायकलने वरोरा येथे जात असतांना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (CG ०८ AW ४४३५) त्यांच्या दुचाकीला (MH ३४ T ९३२६) जोरदार धडक दिली. या अपघातात आई व मुलगी ट्रकच्या समोरील दोन चाकांच्या मधात अडकल्याने आईचा पाय तर मुलीचा हात ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. तर दुचाकी चालक हा उसळून रोडच्या विरुद्ध बाजूने पडल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. राजिक गफूर शेख (३४), रुबिना राजिक शेख (३०) व कु. नाज राजिक शेख (१४) रा. चुनावार्ड वरोरा असे या अपघातात जखमी झालेल्या पती, पत्नी व मुलीचे नाव आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकालाही अटक केली आहे. ट्रक चालकावर बीएनएसच्या कलम २८१, १२५(B) सहकलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जमादार गजानन होडगीर व पोलिस शिपाई पुरुषोत्तम डडमल हे करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी