अखेर तिढा सुटला, वणी मतदारसंघ शिवसनेच्या (उबाठा) वाट्याला, शेवटी संजय देरकर यांनाच उमेदवारी जाहीर
प्रशांत चंदनखेडे वणी
महाविकास आघाडीत वणी विधानसभा क्षेत्रावरून रान पेटले असतांना शिवसेनेने मात्र या मतदार संघावरील आपला दावा सोडला नाही. आणि संजय देरकर यांच्यावरच विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली. संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर होताच शहरात एकच जल्लोष करण्यात आला. त्यांच्या उमेदवारीने शिवसैनिकांमध्ये आनंद संचारला आहे. शिवसेना वणी विधानसभा क्षेत्रात नवचैतन्य जागलं आहे. शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, आणि त्यात संजय देरकर यांचं नाव ९ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्यावरून व उमेदवारी वरून सुरु असलेला तिढा आता कायमचा सुटला आहे. तसेच काँग्रेस की सेना या वेळोवेळी जनतेला संभ्रमात टाकणाऱ्या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला आहे. वणी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी अनेकांनी मोर्चे बांधणी केली होती. मात्र शेवटी संजय देरकर यांचीच खेळी यशस्वी ठरली.
Comments
Post a Comment