वंचित कडून राजेंद्र निमसटकर यांची उमेदवारी निश्चित, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज ?

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

राजकीय पक्षांची समीकरणं बदलविणारी वंचित बहुजन आघाडी गेम चेंजरच्या भूमिकेत समोर आली आहे. राजकीय पक्षांचे डावपेच पालथे घालण्यात वंचित बहुजन आघाडीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मतदारही कट्टर आहेत. एकनिष्ठ मतदारांमुळे वंचितने दिग्गज उमेदवारांची गणितं बिघडविली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी नेहमीच वंचितचा धसका घेतला आहे. विधानसभेच्या २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली मते राजकीय मात्तबरांची डोळे विस्फारणारी ठरली. मागील दहा वर्षात एक मोठा पक्ष म्हणून वंचितने उसंडी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघातून डॉ. महेंद्र लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी १५ हजारांच्यावर मते घेऊन दिग्गजांना भुवया उंचावण्यास भाग पाडले होते. २०२४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसामान्यांशी नाळ जुळलेल्या एका जाणकार, अनुभवी व दांडगा जनसंपर्क असलेल्या व्यक्तीला वंचित कडून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जेष्ठ पत्रकार तथा समाजकारण व राजकारणात वलय निर्माण करणारे राजेंद्र निमसटकर यांना वंचित कडून उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आपला नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा वंचितच्या स्थानिक नेत्यांमध्ये रंगली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभेच्या लढती नेहमीच रंगतदार केल्या आहेत. वणी मतदार संघात वंचितने जानता उमेदवार दिल्यास येथीलही लढत रंगतदार होईल, यात शंका नाही. 

महायुती, महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीही आज आपला उमेदवार जाहीर करणार आहे. यात राजेंद्र निमसटकर यांचं नाव आघाडीवर आहे. राजेंद्र निमसटकर यांना उमेदवारी मिळाल्यास वैचारिक मतांची मोठी गोळाबेरीज वंचित जुळवेल अशी शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने नेहमीच निर्णायक भूमिका वठविली आहे. तसेच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गणितं बिघडविली आहे. वंचितने तळागाळातील एका सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला उमेदवारी दिल्यास त्याचा वंचितला मोठा फायदा होऊन वणी मतदार संघात वंचित परत एकदा निर्णायक भूमिका वठवू शकेल, असा मतप्रवाह दिसून येत आहे. वंचितचा कट्टर, अल्पसंख्यांक व बहुजन समाजातील वैचारिक पातळी जपणारा मतदार वंचितने योग्य उमेदवार दिल्यास वंचितच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आपली ताकद दाखवून देईल. वणी विधानसभा क्षेत्रातील जवळपास ६ ते ७ टक्के मतदार वंचितशी एकनिष्ठ आहेत. बहुजनातील वैचारिक मतदार वंचितकडे वळल्यास ही टक्केवारी १० च्या घरातही जाऊ शकते. त्यासाठी सर्वसामान्यांशी जुळलेला योग्य उमेदवार वणी मतदार संघात देणे गरजेचे आहे. वंचित तिहेरी लढत चौरंगी करण्याची ताकद आजही ठेवते. आणि म्हणूनच राजकीय, सामाजिक वलय असलेला उमेदवार वंचित कडून देण्यात यावा, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. यातच राजेंद्र निमसटकर यांचं नाव वंचित कडून पुढे असल्याने वणी मतदार संघात एका जाणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमधून व सुज्ञ जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी