लालपुलिया येथे अपघातात ठार झालेल्या युवकाची अद्यापही पटली नाही ओळख

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया येथे अपघातात ठार झालेल्या युवकाची अद्यापही ओळख पटलेली नाही. १४ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पोलिसांना एक अनोळखी युवक अपघातात ठार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, व मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर मृतकाची ओळख पटविण्याचा पोलिसांकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आला. बेपत्ता युवकांच्या तक्रारी असलेल्या कुटुंबीयांकडूनही मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आसपासच्या पोलिस स्टेशन मधीलही बेपत्ता युवकांच्या तक्रारी तपासण्यात आल्या. मात्र अद्यापही अपघातात मरण पावलेल्या या युवकाची ओळख पटलेली नाही. मृतकाची ओळख पटविण्याचा हरसंभव प्रयत्न केल्यानंतर शेवटी पोउपनि अश्विनी रायबोले यांच्या फिर्यादी वरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लालपुलिया येथील मोहम्मद अन्सारी यांच्या टायर पंचर दुरुस्तीच्या दुकानाजवळ एका युवकाचा अपघात होऊन तो जागीच ठार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या पोउपनि अश्विनी रायबोले यांनी रात्रपाळीतील पोलिसांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातात मृतकाचा चेहरा पूर्णतः छिन्न विछिन्न झाला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र मृतकाची आद्यपही ओळख पटली नाही. मृतक हा कोण व कुठला हे अद्याप कळू शकले नाही. मृतक हा अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मृतक युवकाने नाईट पॅन्ट व शर्ट परिधान केलेला होता. मृतकाची ओळख पटविण्याचा हरसंभव प्रयत्न केल्यानंतर शेवटी पोउपनि अश्विनी रायबोले यांनीच स्वतः फिर्याद नोंदवून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम १०६(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध व अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी