वणी मतदार संघात मनसेचा झंझावात, शहरातून काढण्यात आली भव्य प्रचार रॅली

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांचा वणी विधानसभा क्षेत्रात धडाकेबाज प्रचार सुरु आहे. वणी, मारेगाव व झरी या तीनही तालुक्यात राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मतदार संघ पिंजून काढत त्यांच्या प्रचाराची धुरा वाहिली. राजू उंबरकर यांनी देखील गावागावात प्रचार रॅली व कॉर्नर सभा घेतल्या. या निवडणुकीत रेल्वे इंजिनलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. त्यांच्या प्रचार रॅली व सभांना नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसला. त्यांना समर्थन देणारे समर्थकही मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जुळले आहेत. अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. नरसाळा येथील तंटामुक्त अध्यक्षासह गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्याने आपल्या समर्थकांसह मनसेला जाहीर पाठिंबा दर्शविला. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. काल १७ नोव्हेंबरला राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मनसे सैनिकांसह राजू उंबरकर यांचे समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीतून राजू उंबरकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

रविवारी दुपारी शासकीय मैदानावरून राजू उंबरकर यांनी भव्य प्रचार रॅली काढली. ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत शिवतीर्थ चौक येथे पोहचल्यानंतर मनसे सैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रॅलीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली. यावेळी राजू उंबरकर यांनी सत्ताधारी आमदारांवर विकास कामांवरून जोरदार निशाणा साधला. लोकप्रतिनिधीवर त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले. तेंव्हा जनतेने सर्वांना आजमावले एकदा मनसेलाही संधी देऊन बघा, असे नम्र आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. रॅलीत मनसे सैनिक, समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजू उंबरकर यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी