वणी तालुक्यातील कोलेरा गावात साचले पावसाचे पाणी, वेकोलिच्या नियोजनशून्यतेचा गावकऱ्यांना बसला फटका
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील तिने ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत असल्याने कोलेरा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वेकोलिच्या ढिसाळ नियोजनामुळे गावाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. गावातील काही घरांना तर पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. घरांमध्ये प्रचंड पाणी शिरल्याने काही कुटुंबं उघड्यावर आली आहेत. त्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागत आहे. वेकोलिने डंप केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे कोलेरा या गावात ही परिस्थिती उद्भवली आहे. भूस्खलनामुळे गावातील पाणी वाहवून नेणारा नाला अरुंद झाला असून नाल्यातील पाण्याचा प्रवाह पूर्णपणे खुंटला आहे. त्यामुळे कोलेरा गाववासीयांवर पूर परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सारखा पाऊस सुरु आहे. कधी तीव्र तर कधी माध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. संततधार व मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे कोलेरा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याने या गावाला पूर्णपणे वेढले आहे. पावसाच्या पाण्यामुळे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले असून काही कुटुंबं उघड्यावर आली आहेत. त्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा काही घरांना चांगलाच फटका बसला आहे. वेकोलिच्या डम्पिंग यार्डमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वेकोलिने कोलेरा गावाच्या सभोताल मातीची भिंत बांधल्याने पाणी वाहून नेणारा नाला अरुंद झाला आहे. तसेच वेकोलिच्या डंपिंगमुळे मोठमोठे मातीचे डोंगर तयार झाल्याने याठिकाणी होणाऱ्या भूस्खलनामुळेही नाल्याचा प्रवाह खुंटला आहे.
कोळसाखाणीचा विस्तार व भूगर्भातून कोळसा बाहेर काढण्याकरिता कोळसाखाणीत खोलवर उत्खनन करण्यात येते. उत्खननातून निघणारी माती व मुरूम कोळसाखाण परिसरातच तयार करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे कोळसाखाण परिसरात मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. जमिनीपासून किती मीटर उंच मातीचे ढिगारे असावे, याचे नियम बांधून देण्यात आले आहेत. मात्र वेकोलिने नियमांना धाब्यावर बसवून उंच मातीचे मनोरे तयार केले आहेत. या नियमबाह्य मातीच्या ढिगाऱ्यांमुळे येथे नेहमी भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला असतो. एवढेच नाही तर कोळसाखाण क्षेत्रात कित्येकदा भूस्खलन झाले देखील आहे.
हळू हळू होत असलेल्या भूस्खलनामुळे कोलेरा गावातील पाणी वाहून नेणारा नाला बंद झाला आहे. त्यातच वेकोलिने कोलेरा गावाच्या सभोताल मातीची भिंत बांधल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे कोलेरा या गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागत आहे. काही नागरिकांच्या घरात प्रचंड पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान देखील आहे. वेकोलिच्या नियोजनशून्यतेमुळे गावकऱ्यांवर पूर परिस्थिती ओढवली असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment