प्रशांत चंदनखेडे वणी
जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भालर येथे घडली. दोघांमध्ये असलेला जुना वाद अचानक उफाळून आला, व एकाने दुसऱ्यावर बैलबंडीच्या उभारीने हल्ला चढविला. या हल्ल्यात भालर येथील युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
भालर येथे राहणाऱ्या नरेंद्र दोडके या युवकावर गावातीलच आशिष मधुकर वरारकर (३५) याने जुन्या वादातून प्राणघातक हल्ला चढविला. या दोघांमध्ये जुना वाद होता. १२ ऑक्टोबरला नरेंद्र दोडके हा प्रवासी निवाऱ्याजवळील एका पान ठेल्यासमोर उभा असतांना आरोपी आशिष वरारकर याने त्याच्यावर बैलबंडीच्या लाकडी उभारीने जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात नरेंद्र दोडके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बैलबंडीच्या उभारीने नरेंद्र दोडके याच्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यावसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. आशिष वरारकर याने जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता बेसावध असलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. याबाबत नरेंद्र दोडके याच्या बहिणीने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशिष वरारकर याच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्या प्रकरणी भादंवि च्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय राजेश पुरी करीत आहे.
No comments: