Latest News

Latest News
Loading...

मद्यपी तरुणांचा आशा बार समोर उभा धिंगाणा, घराकडे जात असलेल्या वेकोलि कर्मचाऱ्याला व परिसरातील दोन तरुणांना केली मारहाण

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरोरा राज्य महामार्गावरील विठ्ठलवाडी वळण रस्त्यावर असलेल्या आशा बार समोर मद्याची झिंग चढलेल्या टपोरी तरुणांनी गोंधळ घालत रहिवाशी वस्तीकडे जाणाऱ्या लोकांशी विनाकारण वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले वेकोलि कर्मचारी कारने आपल्या निवास्थानाकडे जात असतांना दारू पियुन बार समोर गोंधळ घालत असलेल्या उचापतखोर तरुणांनी विनाकारण त्यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. मद्यपी तरुणांनी त्यांची कार अडवून त्यांना शिवीगाळ करणे सुरु केले. दरम्यान परिसरातीलच दोन तरुण रस्त्याने टेहाळणी करीत असतांना त्यांना मोहल्ल्यातील व्यक्तीशी मद्यपी तरुण वाद घालतांना दिसले. त्यांनी त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला असता हे मद्यधुंद तरुण त्यांच्याच अंगावर धावून गेले. हे बघून वेकोलि कर्मचारीही कारच्या खाली उतरले. चार ते पाचच्या संख्येने असलेल्या या दारुड्यांनी वेकोलि कर्मचारी व परिसरातील दोन तरुणांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही तरुण मंडळी व महिला पुरुषांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी काही मद्यपी तरुणांना चोप दिला तर काही पळत सुटले. या घटनेची माहिती बार मालकाला देऊन त्याला बार जवळ येण्यास सांगितले असता तो आला नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शीघ्र घटनास्थळ गाठले. दरम्यान महिला व पुरुषांनी बार मालकावर रोष व्यक्त करीत बारच्या काचा फोडल्या. पोलिसांनी दारूच्या नशेत दादागिरीचा आव आणणाऱ्या दोन टपोरी तरुणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले अनिल उद्धवराव बद्खल (५३) हे त्यांच्या पत्नीसह कारने काही कामानिमित्त नागपूरला गेले होते. रात्री १०.३० वाजता ते नागपूर वरून वणीला आले. वणी वरोरा मार्गावरील वळण रस्त्यावरून ते आपल्या घरी जात असतांना रस्त्यावरच असलेल्या आशा बार समोर काही मद्यपी तरुण झिंगाट करीत होते. रस्त्यावरच त्यांचा उभा धिंगाणा सुरु होता. अनिल बद्खल यांनी कार पुढे नेण्याकरिता हॉर्न वाजविला असता हे झिंगाटलेले तरुण त्यांच्या कारपुढे उभे झाले. हॉर्न का वाजविला म्हणून त्यांना अश्लील शिवीगाळ करू लागले. कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. त्यांचा झिंगलेला अवतार पाहून अनिल बद्खल यांनी त्यांच्या तोंडाला न लागता बाजूने कार काढण्याचा प्रयत्न केला असता या मद्यधुंद तरुणांनी त्यांची कार रोखली, व त्यांना अश्लील शिवीगाळ करीत कार मधून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी रस्त्याने टेहाळणी करीत असलेल्या मोहल्ल्यातीलच दोन तरुणांना काही मद्यपी तरुण अनिल बद्खल यांच्याशी वाद घालतांना दिसले. त्या दोन तरुणांनीही मद्यपींना समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांच्याच अंगावर धावून गेले. हे पाहून अनिल बद्खल कारखाली उतरले. या टपोरी तरुणांनी अनिल बद्खल व दोनही तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची आरडा ओरड ऐकून परिसरातील काही तरुण मंडळी व महिला पुरुषांनी घटनास्थाकडे धाव घेतली. त्यांनी हाती लागलेल्या तरुणांना चांगलाच चोप दिला, तर काही मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले. त्यांनी बार मालकाला फोन करून बोलावले असता तो आला नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी बारच्या काचा फोडून आपला राग व्यक्त केला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अनिल बद्खल यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चेतन अशोक रिंगोले (२५) व अनुवंश सातपुते (२४) रा. छोरीया ले-आऊट या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४, २९४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय जगदीश बोरनारे करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.