प्रशांत चंदनखेडे वणी
वणी येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष भोयर यांची पत्नी डॉक्टर प्रियंका भोयर यांचं निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ३७ वर्षांचं होतं. ही घटना शुक्रवार २७ जूनला पहाटे उघडकीस आली. डॉ. प्रियंका या रात्री झोपल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्याच नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना झोपेतच व्ह्रदय विकाराचा झटका आला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. तरीही त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण जाणून घेण्याकरिता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
डॉक्टर भोयर दाम्पत्याचे शहरातील गांधी चौक येथे वात्सल्य बाल रुग्णालय या नावाने रुग्णालय असून डॉक्टर प्रियंका या त्वचारोग तज्ज्ञ होत्या. रुग्णालयाच्या वरच्या माळ्यावर त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांचा असा हा अचानक मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. प्रियंका या सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने शहारत शोककळा पसरली आहे. डॉ. प्रियंका यांच्या पश्च्यात पती डॉ. संतोष भोयर व सात वर्षांची मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मुलीच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. डॉ. प्रियंका यांची अचानक झालेली एक्झिट कुटुंबियांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुखी सांसारिक जीवनात रममाण असलेल्या डॉ. प्रियंका यांना नियतीने डाव साधून कायमचे हिरावून घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
No comments: