प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील रंगनाथ नगर येथे वास्तव्यास असलेल्या बापूराव येलब्बा चाटे (८४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते मूळचे धानोरा (लिंगटी) येथील रहिवाशी होते. मादगी समाजाची परंपरा जोपासण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा व ओळख होती. परिसरात त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. सुस्वभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या बापूराव चाटे यांचं २६ जूनला रात्री ९ वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. ते पत्रकार सुरज चाटे यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्च्यात मुलगा, मुलगी, जावई, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने समाज व कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
No comments: