Latest News

Latest News
Loading...

नैराश्येतून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. प्रिया बन्सी प्रजापती वय अंदाजे १८ वर्ष असे या गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. 

राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या प्रियाने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती पुढील शिक्षण घेण्याच्या तयारीत असतांना तिने नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने प्रियासह तिच्या बहिणींचा सांभाळ केला. प्रियाला दोन बहिणी असून मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. २६ जूनला दुपारी घरी कुणी नसतांना तिने घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांना प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रियाच्या आत्त्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस तिच्या आत्महत्त्या करण्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. तारुण्याच्या उंबरठयावर पदार्पण केल्यानंतर काही विशिष्ट कारणांवरून आलेल्या नैराश्येतून तरुणवर्ग आत्मघात करू लागल्याने पालक वर्ग कमालीचा चिंतेत आला आहे. तरुणांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.