Latest News

Latest News
Loading...

वादळी वारा व मुसळधार पावसामुळे डी-लाईट कंपनीचे टिनाचे शेड कोसळले, एका मजूर महिलेचा मृत्यू तर सात मजूर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे झरी तालुक्यातील गणेशपूर येथील एका कंपनीचे टिनाचे शेड कोसळल्याने एका मजूर महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. तर सात मजूर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार २५ जूनला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. गंगा सुगवीर कंवर (२०) रा. पेरीटोला, राजनांदगाव (छत्तीसगड) असे या मृत महिलेचे नाव आहे.

झरी तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत डी-लाईट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही व्हाईट वॉश पावडर तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत असंख्य मजूर काम करतात. २५ जूनला रात्री ९ वाजताच्या सुमारास कंपनीत व्हाईट वॉश पावडरची पॅकिंग करण्याचे काम सुरु असतांना सुसाट वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने मजूर काम करीत असलेले कंपनीतील टिनाचे शेड कोसळले. यात टिनाच्या शेडखाली दबून एका मजूर महिलेचा मृत्यू झाला. तर सात मजूर जखमी झाले आहे. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गणेशपूर येथील डी-लाईट केमिकल कंपनीत चुनखडी (डोलोमाईट) पासून व्हाईट वॉश पावडर तयार करून त्याची राज्यात व राज्याबाहेर विक्री केली जाते. या कंपनीत शेकडो मजूर काम करतात. २५ जूनला रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. त्यावेळी कंपनीतील टिनाच्या शेडमध्ये व्हाईट वॉश पावडरची पॅकिंग करण्याचे काम सुरु होते. वादळ वारा व मुसळधार पावसामुळे टिनाचे शेड कोसळले. यात गंगा सुगवीर कंवर या मजूर महिलेचा मृत्यू झाला. तर इतर सात मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी मीना आत्राम (४५) रा. मोहदा ता. वणी या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. इतर जखमी मजुरांमध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

No comments:

Powered by Blogger.