ध.कु. विकास संस्थे द्वारा आयोजित शारदा महोत्सवाने घातली बौद्धिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची सांगड, मार्गदर्शन व स्पर्धाचंही करण्यात आलं आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
धनोजे कुणबी विकास संस्थेच्या वतीने २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत स्थानिक धनोजे कुणबी सभागृह येथे शारदा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य व विविध विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आले. दररोज नेत्रदीपक महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात व्हायची. आध्यात्मिक व बौद्धिक विचारांची सांगड घालून विविध चर्चा सत्राने रंगलेला अप्रतिम असा हा शारदा महोत्सव नृत्य कलांच्या सादरीकरणाने वैशिट्यपूर्ण ठरला. या महोत्सवात विविध अंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मार्गर्दशन व मनोरंजन अशा विविध छटांनी हा महोत्सव रंगला. विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे हा शारदा महोत्सव महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणारा ठरला.
ध.कु. विकास संस्थेच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्लड कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रिया बाल्लीकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून वरोरा भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. माधवी बदखल, मा. तृप्ती उंबरकर, ध.कु. विकास संस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर, साधना गोहोकार, शारदोत्सव समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी देरकर उपस्थित होत्या. तसेच विशेष सत्कारमूर्ती व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रजनी आत्राम, मोनाली गोवारदीपे व साधना मत्ते या उपस्थित होत्या. विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या या शारदा महोत्सवाने महिलांचा उत्साह व बौद्धिक ज्ञान वाढविण्याची किमया साधली. या महोत्सवात आगळ्या वेगळ्या महाआरतीसह अध्यात्मिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक खेळ, नृत्य, एकांकी स्पर्धा, प्रदर्शनी, चर्चासत्र, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नकला तथा विविध स्पर्धांचे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य व विविध विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले. तसेच माँ जगदंबा जागरण व भजन संध्याच्या आयोजनामुळे धार्मिक परंपरांची जपवणूक व मन शांती घडवून आणण्याचं काम या महोत्सवाने केलं. डोळ्यात साठवुन ठेवावा असा हा शारदा महोत्सव महिलांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडला.
हा शारदा महोत्सव यशस्वी करण्याकरिता समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी देरकर, लता वासेकर. संगिता खाडे, स्मिता नांदेकर, सविता गौरकार, ध.कु. विकास संस्थेच्या पदाधिकारी वंदना आवारी, अर्चना बोदाडकर, कविता चटकी, वनिता काकडे, रुपाली कातकडे, शारदा ठाकरे, संध्या बोबडे तथा शारदोत्सव समिती व ध.कु. विकास संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments: