Latest News

Latest News
Loading...

एमआयडीसी परिसरातील दुकान फोडणाऱ्या चोरट्याला एलसीबी पथकाने अवघ्या दोन तासांत केली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील एमआयडीसी परिसरातील दुकान फोडून दुकानातील वस्तू व साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या दोन तासांत अटक केली. त्याच्या जवळून पथकाने १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख सलीम शेख इस्माईल (४९) रा. खडबडा मोहल्ला असे या एलसीबी पथकाने अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. 

एमआयडीसी परिसरातील गजानन फर्निचर या दुकानात ३० जूनच्या रात्री चोरी झाली. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील वस्तू व साहित्य लंपास केले. १ जुलैला सकाळी ९ वाजता ही चोरीची घटना उघडकीस आली. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालक अनिकेत गजानन गहुकर (२५) यांनी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तक्रार दाखल होताच गुन्हेगारांचा शोध लावण्यात तरबेज असलेल्या एलसीबी पथकाने शीघ्र तपासचक्रे फिरवून व खबऱ्यांना अलर्ट करून अवघ्या दोन तासांत या चोरी प्रकरणाचा छडा लावला. दुकान फोडणाऱ्या शेख सलीम शेख इस्माईल याच्या मुसक्या आवळून त्याने चोरी केलेला मुद्देमाल एलसीबी पथकाने जप्त केला. 

कौशल्यपूर्ण तपास करून एलसीबी पथकाने अवघ्या दोन तासांत चोरट्याला जेरबंद केले. त्याच्या जवळून पथकाने एक वेल्डिंग मशीन किंमत ८ हजार रुपये, ग्राइंडर किंमत ६ हजार रुपये, स्क्रू मशीन किंमत ४ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक बोर्ड किंमत ५०० रुपये असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर, पीएसआय धनराज हाके, पोना सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, सलमान शेख, नरेश राऊत यांनी केली. 


No comments:

Powered by Blogger.