प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात नियमबाह्य पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या स्कुल बस व ऑटोवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी वणी वाहतूक उपशाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरात व शहरालगत अनेक इंग्रजी माध्यमिक शाळा आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात स्कुल बस लावण्यात आल्या आहेत. तसेच काही विद्यार्थी ऑटोने सुद्धा शाळेत जाणे येणे करतात. स्कुल बस व ऑटोचा खर्च पालकांनाच उचलावा लागतो. पण स्कुल बस व ऑटोतुन शाळेचा प्रवास करणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत, याकडे मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शाळा व्यवस्थापन केवळ पालकांकडून स्कुल बसची फी वसूलण्याचं काम करते.
पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन गंभीर असल्याचे दिसत नाही. स्कुल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात. ऑटो मधूनही विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरु आहे. स्कुल बसचे परमिट तपासले जात नाही. फिटनेस तपासले जात नाही. अनेक ऑटोचे परमिट कालबाह्य झाले आहेत. त्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट नाही. काही स्कुल बस व ऑटो चालकांकडे तर वाहन चालविण्याचा परवाना देखील नाही. वाहनांमध्ये प्रथोमपचार पेटी नाही. वाहतुकीचे सर्रास नियम मोडून स्कुल बस व ऑटो शहरात धावत आहेत. आणि या वाहनांमधून विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची ने-आन करणाऱ्या स्कुल बस व ऑटोमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनांमध्ये भरले जात असल्याने दुर्दैवी प्रसंग घडण्याची शक्यता नाकारत येत नाही. स्कुल बस व ऑटोच्या नियमबाह्य वाहतुकीमुळे यापूर्वी गंभीर अपघात झाले देखील आहेत. तरीही मुद्दत संपलेल्या स्कुल बस व ऑटोतुन शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आन सुरु आहे. त्यामुळे या स्कुल बस व ऑटोची तपासणी होणे गरजेचे झाले आहेत. आरटीओ विभागाच्या निर्देशानुसार वाहनांच्या असणाऱ्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र नसलेल्या शाळेच्या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी मनसेच्या वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी वाहतूक उपशाखेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
No comments: