Latest News

Latest News
Loading...

मोहदा येथे उद्या भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर, गंभीर रोगांची केली जाईल मोफत तपासणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व मोहदा क्रेशर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबरला जिल्हा परिषद शाळा मोहदा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे. आजच्या या धकाधकीच्या काळात मनुष्याचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. शरीर निरोगी राहावं म्हणून मनुष्य कुठल्याही प्रकारची काळजी घेतांना दिसत नाही. स्वस्थ व तंदुरुस्त आरोग्यासाठी वेळोवेळी आरोग्याची तपासणी होणं गरजेचं आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याची तपासणी करणं शक्य होत नसल्याने सामाजिक दायित्व जोपासून सेवाभावी संस्था व प्रतिष्ठित व्यवसायिकांकडून आयोग्य तपासणी शिबिरं घेतली जात आहे. मोहोदा येथेही सामाजिक जाणिवेतून भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 

या शिबिराला विशेष अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहणार आहेत. शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच मोहदा ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षा राजूरकर, उपसरपंच सचिन रासेकर, सदस्य गणेश बोन्डे, गजानन शेलवाडे, बेबी उईके, अर्चना गेडाम, सुवर्णा बोन्डे, सिमा ढुमणे, शोभा टेकाम यांची देखील या शिबिराला उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरात लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. व्ह्रदय रोग, सांधे व गुडघे दुखणे, स्त्रीरोग, मुख कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, रक्तदाब, डायबेटिज, त्वचा रोग आदी गंभीर रोगांची तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. तसेच शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी करण्यात येणार असून दृष्टिदोष असलेल्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची होमोग्लोबीन व रक्तगट तपासणी देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. आरोग्याविषयी साशंकता न ठेवता आरोग्याची तपासणी करून रोगांचं निदान करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी मोहदा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्याची तपासणी करून रोग निदान करून घेण्याचे आव्हान आयोजकांनी आहे.  

मोहदा क्रेशर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश बियाणी ( श्री साई मिनरल्स मोहदा), सचिव इस्माईल झवेरी ( विदर्भ प्रोजेक्ट प्रा.ली. मोहदा), कोषाध्यक्ष रमेश मुंधडा (बालाजी असोसिएशन मोहदा) यांच्या सहकार्यातून हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, सचिव कुंजबिहारी परमार यांचा या शिबिराला सहयोग लाभला आहे. या शिबिराचा वणी उपविभागातील जनतेने मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आपले आहे.  

No comments:

Powered by Blogger.