Latest News

Latest News
Loading...

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या विभागीय सचिव पदी मुस्कान सय्यद यांची निवड

प्रशांत चंदनखेडे वणी 

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या कार्यकारणीचा नुकताच विस्तार करण्यात आला. या विस्तारित कार्यकारणीत अमरावती विभागीय सचिव पदी मुस्कान जलील सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कर्नल तेजेंद्रपाल त्यागी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे महासचिव हरिश्चंद्र राठोड यांनी कार्यकारणीचा विस्तार करून विदर्भस्तरीय कार्यकारणी गठीत केली. या कार्यकारणीमध्ये अमरावती विभागीय सचिव म्हणून मुस्कान सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचं कार्य, कौशल्य व कर्तव्याची पावती म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांनी इतरांनाही राष्ट्र सेवेची प्रेरणा देऊन त्यांच्यात राष्ट्र भक्ती जागवावी ही अपेक्षा व्यक्त करतांनाच युवा वर्गाला राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याकरिता प्रयत्नशील राहण्याची सदिच्छा व्यक्त करून त्यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

No comments:

Powered by Blogger.